पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीनः मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; रात्री उशीरा झाली बालसुधारगृहातून सुटका

पुणे: पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशील असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाची आत्या पुजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. कोर्टाने मुलाला अत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
अल्पवयीन आरोपीची आत्याने हेबियस कॉर्पस याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका मान्य करण्यात आली. कायद्यानुसार कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात घेता येत नाही, यावर याचिका दाखल केली होती वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने अल्पवयीन मुलाला मुक्त करण्याचे आदेश दिले. २२ मे २०२४, ५ जून २०२४ आणि १२ जून २०२४ रोजीचे जे आदेश आहेत ज्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते ते बेकायदेशील आहेत असे कोर्टाने निकालात म्हटल्याचे वकीलांनी सांगितले.
Link source Punekar news
बालन्याय मंडळाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी आदेश दुरुस्तीसाठी अर्ज करणे आणि त्या अर्जावर मंडळाने सुधारगृहाच्या कोठडीचा आदेश दिल्याने पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेणे हे बेकायदा, असे हायकोर्टाने मुलाच्या आत्याच्या याचिकेवर निर्णय देताना स्पष्ट केले.
आरोपीला १५ तासानंतर निबंध लिहून जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी हे देखील तुरुंगात आहेत. नियमांचे उल्लंघन करून पोर्शे कारची चावी दिल्याचा आरोप वडिलांवर आहे तर आईवर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.