अक्कलकोट: उजनी धरणाचे पाणी सोडण्यासाठी प्रसाद बसवराज बाबानगरे यांच्या पाठपुराव्याला यश
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रसाद बसवराज बाबा नगरे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिनांक 29 जुलै 2024 रोजी त्यांनी उजनी धरणातील पाणी अक्कलकोट तालुक्यातील सर्व नद्या व तलावांमध्ये सोडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, जिल्हा सोलापूर यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा:
पावसाच्या अभावामुळे अक्कलकोट तालुका दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरा जात होता. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. परंतु, प्रसाद बसवराज बाबा नगरे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहा व्हिडिओ
संघर्षाला यश:
“शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जगतील आणि पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होईल,” असे नगरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त:
तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. उजनी धरणातील पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तलाव व नद्यांना पाणी मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.
अक्कलकोटच्या या पाणी प्रश्नावर लवकरच तोडगा निघाल्याने शेतकरी समुदायाने नगरे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आहे.