अक्कलकोट विधानसभा: अपक्ष उमेदवार प्रसाद बसवराज बाबानगरे यांचा ऑटो रिक्शा चिन्हासह जोरदार प्रचार सुरू
अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले श्री. प्रसाद बसवराज बाबानगरे यांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. ऑटो रिक्शा हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाबानगरे यांनी लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
डोर टू डोर प्रचार मोहीम राबवत त्यांनी मतदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधला. त्यांच्या या मोहिमेला स्थानिक जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध वस्ती, गावे, आणि शहरांमध्ये प्रचार करताना बाबानगरे यांनी त्यांच्या आगामी योजनांबाबत माहिती दिली आणि जनतेला दिलेली आश्वासने पाळण्याचा शब्द दिला आहे.
पहा व्हिडिओ
“मी लोकांचा उमेदवार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे,” असे बाबानगरे यांनी सभेत सांगितले. प्रचारादरम्यान तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक स्तरातील लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.
अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळात बाबानगरे यांच्या अपक्ष उमेदवारीवर चर्चा सुरू असून त्यांच्या प्रचाराने वातावरण तापले आहे. आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.