अक्कलकोट विधानसभा निवडणूक: प्रसाद बाबानगरे यांचा ऑटो रिक्षा चिन्हावर जनतेचा वाढता विश्वास

IMG-20241117-WA0005.jpg

अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून श्री. प्रसाद बसवराज बाबानगरे यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षा चिन्हासह प्रचाराला वेग दिला आहे. घराघरात पोहोचत डोर टू डोर प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.

गावागावांतील समस्यांना समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत बाबानगरे यांनी विकासाची नवी दृष्टी सादर केली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी विविध वस्ती आणि भागांमध्ये भेटी देत लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रामाणिकतेने आणि धडाडीने स्थानिक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पहा व्हिडिओ

“अक्कलकोटचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक हाच माझा प्राधान्यक्रम आहे,” असे बाबानगरे म्हणाले. त्यांच्या मोहिमेत युवकांसह महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसत आहे.

या निवडणुकीत बाबानगरे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्थानिक राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनोख्या शैलीने आणि लोकांशी थेट संपर्काने अक्कलकोटच्या निवडणूक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत या मोहिमेचा परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

You may have missed