पुणे: जय जवान नगर दुर्गा माता प्रतिष्ठानला दुसऱ्या माळेची आरतीचा मान; मनोज शेट्टी आम आदमी पार्टीचे शहर

पुणे : जय जवान नगर दुर्गा माता प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवरात्री उत्सवात दुसऱ्या माळेला झालेल्या आरतीचा मान अखिल जय जवान नगर दुर्गा माता प्रतिष्ठानला लाभला. या वेळी परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीची आरती साधली.
प्रतिष्ठानतर्फे वर्षभर सामाजिक सलोखा जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये गरबा-दांडिया स्पर्धा, सामूहिक महिलांच्या हस्ते आरती, भजन कार्यक्रम तसेच दसऱ्याच्या दिवशी भक्तांना अन्नदान अशा उपक्रमांचा समावेश आहे.

संस्थापक अध्यक्ष रवी भाई परदेशी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ आपण गणेशजी घायमुकते आणि सनी भाऊ शिंदे यांनी आरतीसाठी आमंत्रित करून सन्मान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या निमित्ताने “मंडळाच्या माध्यमातून समाजसेवा आणि देशसेवा सतत घडत राहो,” अशी प्रार्थना दुर्गामातेसमोर करण्यात आली.
या प्रसंगी आम आदमी पार्टी, पुणे शहर संघटन सहमंत्री मनोज शेट्टी (बीए-पॉलिटिकल सायन्स), प्रभाग क्रमांक ६, येरवडा-गांधीनगर उपस्थित होते.