येरवडा: डांबर प्लांट हटवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा – भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून आयुक्तांना निवेदन

0
FB_IMG_1752152879385.jpg

पुणे, ता. १० : येरवडा प्रभाग क्रमांक ६ मधील रहिवाशांना त्रास देणारा डांबर प्लांट तातडीने हटवावा, अन्यथा स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाने दिला आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष मा. अनवर महेमूद पठाण यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन या विषयावर निवेदन दिले.

या वेळी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष राजगुरू, सूरज दुबे, रमेश गव्हाणे, शैलेश हिरणवार, इमाम शेख, सनी अडसूळ, कादिर शेख, रोहित पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पठाण यांनी सांगितले की, “डांबर प्लांटमुळे परिसरात प्रदूषण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.”

शहर प्रशासनाने जर लवकरात लवकर हा डांबर प्लांट हटविला नाही, तर भाजपकडून नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

Spread the love

Leave a Reply