”चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात”; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काही राजकीय भूमिका घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक मतदानाचा तीसरा टप्पा राज्यात पूर्ण झाला. अद्याप तरी त्यांनी तशीकाही भूमिका घेतली नाही.
मात्र, मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर ते ठाम आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकाद विराट सभा घेण्याचे आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याचे सुतोवाच केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का? असा सवाल त्यांनी उपस्थित ‘पाटील हे फक्त तेरे नाम स्टाईल भांग पाडून फिरत असतात, त्यांना काय कळतं’ असा थेट प्रहारच जरांगे पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (13 मे) म्हणजे उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडते आहे. हे मतदान खास करुन बीड (Beed) आणि जालना लोकसभा मतदारसंघातही होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटले
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर येत्या 8 जूनरोजी नारायण गड येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यासाठी 15 मे रोजी त्या जागेवर पाहणी करणार आहे. त्यानंतर राज्यभरातील मराठा बांधवांना सभेसाठी येण्याचे अवाहन केले जाईल. जवळपास 6 कोटींहून अधिक मराठा बांधव तेथे जमतील असा आमचा अंदाज आहे. जागेची पाहणी केल्यानंतरच सभेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे मराटा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यावरुन जरांगे पाटील यांनी जोरदार निशाणा साधत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील हे तेरे नाम स्टाईल भांग पाडून फिरत असतात. त्यांना आरक्षणातील काय कळते. ते जर स्वतंत्र उभे राहिले तर त्यांना 37 मते तरी पडतील का? असे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
सरकार अन्याय का करत आहे? जरांगे पाटील यांचा सवाल
दरम्यान, मराठा समाजावर सरकार अन्याय का करत आहे? प्रमाणपत्र देण्याचा विषय होऊनही ती दिली का जा नाहीत. मराठा समाजावर पोलिसांकरवी हल्ला कोणी केला? आंदोलकांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय कोणी घेतला? या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत. मराठा समाज भाजपच्या कधीच विरोधात नव्हता. तो जर विरोधात असता तर तुमचे (भाजप) 106 आमदार निवडूण आलेच नसते असेही जरांगे पाटील म्हणाले.