दहशत निर्माण करणारे 4 सराईत गुन्हेगार येरवड्यातून तडीपार!
पुणे – पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारीत सामील असलेल्या चार अट्टल गुन्हेगारांना 1 वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार झालेल्यांमध्ये वनराज महेंद्र जाधव (वय 21), यशराज आनंद इंगळे (वय 23), हिमालय ऊर्फ गोलू मिटु बिस्ट (वय 21, सर्व रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि मयुर विष्णु गुंजाळ (वय 26, रा. वडारवस्ती, शनिआळी, येरवडा) यांचा समावेश आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर खून, दंगा, गंभीर दुखापत, तोडफोड, घातक शस्त्र बाळगणे, शिवीगाळ व मारहाण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हिंसक व धोकादायक वर्तनामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 04) यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 आणि 56 (1)(अ)(ब) अंतर्गत कारवाई करत या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, सुर्वे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे आणि महिला पोलीस मोनिका पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
येरवडा पोलिसांनी यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करत परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा निर्धार केला आहे.
इन अपराधियों को कहीं भी तडी पार करो यह लोग यही कहीं भी छुप कर रहते है और दहशत फैलाते रहते है.
इनको जेल मे कैद कर के कड़ी से कड़ी सज़ा देनी चाहिए.
Pune zilha pasun door tadipaar kara kothe pune Shahar Aaspas displays jel kotdi dakhva