राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट परीक्षेत अहिल्या नगरच्या भेंडा खुर्द गावच्या सोमेश्वर आघावचे यश

भेंडा : राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट या परीक्षेत भेंडा खुर्द येथील सोमेश्वर गोरक्षनाथ आघाव यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्याबद्दल विठ्ठल अर्बन क्रेडिट पतसंस्थेच्यावतीने आघाव यांचा सत्कार करण्यात आला.
डिव्हाईन कॉलेज ऑफ फार्मसी जी-पॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी मासिक १२ हजार ५०० रुपये विद्यावेतन व ‘नायप्स’ सारख्या शासकीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. परीक्षेत सटाणा महाविद्यालयातील सोमेश्वर आघाव यांनी ३७४७ गुण व नाय पर २५८८ गुण मिळवून विशेष प्राविण्यासह यश संपादन केले. प्राचार्य डॉ. सुनील महाजन, प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रा. डॉ. खेमचंद सुराणा यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल भेंडा येथील विठ्ठल अर्बन क्रेडिट पतसंस्थेच्यावतीने आघाव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णा गव्हाणे साहेब उपाध्यक्ष पत्रकार संतोष औताडे , शुभम आढागळे, कृष्णा मंडलिक, सुरेश दरवडे, दीपक चौधरी, राजेंद्र शिंदे, सावंत मामा, दत्तात्रय शिरसाट, अण्णा दाणे, सुनील फलके , भाऊसाहेब खेडकर, कचरू पालवे , देवादास खेडकर, कालिदास खेडकर, शिवाजी फुलारी रवींद्र खेडकर, राम महाराज, शंकर चौधरी, किशोर वांडेकर , भाऊसाहेब आघाव या संख्येने उपस्थित होते.