‘न्यू आधार अॅप’चे फुल व्हर्जन २८ जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर व पत्ता बदलणे होणार घरबसल्या शक्य

0
Apply-for-an-Aadhar-Card-Online-1536x864.webp

नवी दिल्ली : आधारधारक नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, ‘न्यू आधार अॅप’चे फुल व्हर्जन २८ जानेवारी रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. प्रजासत्ताक दिनानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या या डिजिटल लॉन्चची माहिती स्वतः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) X (ट्विटर) वरील पोस्टद्वारे दिली आहे.

या नव्या अॅपमुळे नागरिकांना आधारशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सुविधा घरबसल्या मिळणार आहेत. विशेष म्हणजे, आता आधार कार्डाची फोटोकॉपी बाळगण्याची गरज भासणार नाही. तसेच आधारवर नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पत्ता बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी व ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

सध्या ‘न्यू आधार अॅप’ Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असले तरी त्यातील अनेक फीचर्स लॉक अवस्थेत आहेत. मात्र २८ जानेवारीनंतर अॅपचे फुल व्हर्जन सुरू झाल्यानंतर हे सर्व फीचर्स अनलॉक होण्याची शक्यता आहे.

UIDAI ने या अॅपच्या लॉन्च संदर्भात “Privacy First” या तत्त्वावर विशेष भर दिला आहे. नागरिकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे हे या अॅपचे प्रमुख उद्दिष्ट असून, डेटा सुरक्षेला प्राधान्य देणारा हा अॅप डिजिटल व्यवहारांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरणार असल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे.

‘न्यू आधार अॅप’च्या माध्यमातून आधार सेवांमध्ये सुलभता, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढणार असून, नागरिकांचा वेळ आणि कागदपत्रांचा त्रास कमी होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed