मोठी बातमी! पोलीस असो की अधिकारी ‘या’ गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच; मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा

110731308.jpg

मुंबई : राज्यात ड्रग्सविरोधात कठोर कारवाईसाठी पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत. ड्रग्स प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सामील आढळल्यास त्याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शनिवारी पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सादरीकरण घेण्यात आल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये जलदगतीने आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

झिरो टोलरन्सी धोरण
ड्रग्सविरोधात झिरो टोलरन्सी धोरण अवलंबले जाईल. कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ड्रग्स प्रकरणात सापडल्यास त्याचे निलंबन न होता थेट बडतर्फ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

संपत्ती परत करण्याचे नियोजन
नव्या कायद्यांतर्गत गुन्ह्यात जप्त केलेली लोकांची संपत्ती सहा महिन्यांच्या आत परत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांतील मुद्देमाल कमी होईल आणि नागरिकांची संपत्ती त्यांना वेळेत मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी कठोर तपास केला असून संपूर्ण पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love

You may have missed